मुक्तपीठ टीम
आयटीसी लिमिटेडने ‘सुपरमिल्क’ या नावाने देशी गाईंच्या दूधापासून बनलेले बिस्किटे बाजारात आणले आहेत. हे देशी उत्पादन सर्व वयोगटातील लोकांच्या आरोग्यास लाभदायी ठरणार आहे. या बिस्किटामुळे शरीराला देशी गाईंच्या दुधाचे फायदे मिळतात. सध्या, तामिळनाडूचा दूध बिस्किट उद्योगात सुमारे ४० टक्के वाटा आहे आणि सनफिस्ट या विभागात धोरणात्मक प्रवेश करत आहे, असे आयटीसीने एका निवेदनात म्हटले आहे.
तामिळनाडूमध्ये या बिस्किटांची पाकिटे ५ रुपये आणि १० रुपयांना मिळतात. बाजारात या सुपरमिल्क बिस्कीट उत्पादनाच्या लॉंचिंगवेळी लोकप्रिय अभिनेत्री सिमरन आणि स्नेहा यांना ब्रँड प्रमोशनल अॅक्टिव्हिटीसाठी सामील करण्यात आले होते. कंपनीने या संदर्भात टीव्हीवर दोन जाहिराती आणल्या आहेत.
बिस्किटे आणि केक्स क्लस्टर, ITC लिमिटेड फूड्स विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी अली हॅरिस शेरे म्हणातात की,, “सनफिस्ट हा तामिळनाडूमधील एक विश्वासार्ह ब्रँड आहे, जो घरातील प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडी पूर्ण करणाऱ्या विविध प्रकारच्या ऑफर प्रदान करतो.”