मुक्तपीठ टीम
संशोधकांनी सुधारित किफायतशीर किंमतीचे जड दुर्मिळ प्रदूषणमुक्त उच्च एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B ) चुंबक तयार केले आहेत, या चुंबकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी जास्त मागणी असून ते ही वाहने अधिक किफायतशीर बनवू शकतात.
९०% पेक्षा जास्त इलेकट्रीक वाहनांमध्ये ब्रशलेस डीसी (बीएलडीसी) मोटर्स वापरल्या जातात ज्या दुर्मिळ पृथ्वी निओडीमियम आयर्न बोरॉन (एनडी-फे-बी) चुंबकांनी बनलेल्या असतात. 1984 मध्ये सागावाने त्याचा शोध लावल्यापासून, एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) चुंबक हा चुंबकीय गुणधर्मांच्या अपवादात्मक संयोजनामुळे बर्याच अनुप्रयोगांसाठी सर्वाधिक मागणी असलेला टिकाऊ चुंबकीय पदार्थ आहे.
इलेकट्रीक वाहनांमध्ये वापरलेले एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B ) चुंबक 150 – 200oC इतक्या उच्च तापमानात कार्य करतात आणि चुंबकीय गुणधर्म नाहीसे झाल्यास (डिमॅग्नेटायझेशन) उच्च प्रतिरोध दाखवणे आवश्यक असते, अशी क्षमता शुद्ध एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) चुंबकांजवळ नसते. त्यामुळे डिस्प्रोशिअम (डीवाय) धातू डिमॅग्नेटायझेशनचा प्रतिरोध सुधारण्यासाठी मिश्रधातू म्हणून त्याला जोडला जातो. जगभरात, संशोधक महागडे डिस्प्रोशिअम धातू न जोडता एनडी-एफई-बी (Nd-Fe-B ) चुंबकांची शक्ती (डिमॅग्नेटाइझेशनचा प्रतिरोध) वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.एनडी-एफई-बी ( Nd-Fe-B) चुंबकाच्या दाण्यांमधली जागा “अचुंबकीय” घटकांसह योग्य उष्णता देण्याचे उपाय वाढवण्याच्या अनुषंगाने (ग्रेन बाउंडरी डिफ्यूजन) चुंबकांची शक्ती वाढवण्यासाठी संशोधन समुदायाने अवलंबलेले धोरण आहे.