मुक्तपीठ टीम
देशभरात अचानक विमान प्रवास महाग होत आहे. जे अनेकदा विमानाने प्रवास करतात, त्यांना याची कल्पना असतेच. सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किंमतीत वाढ दिसून येते. या तिकिटांच्या किंमतींमधील चढ-उताराची अनेक कारणे आहेत. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही याबाबत राज्यसभेत माहिती दिली आहे.
हवाई तिकिटांच्या किंमती सिझननुसार बदलत असतात आणि प्रवासी अॅडव्हान्स्ड बुकिंग करून कमी किंमतीत तिकीट खरेदी करू शकतात. राज्यसभेत या प्रश्नांवर उत्तर देताना सिंधिया म्हणाले की, नागरी विमान वाहतूक क्षेत्र हे नियंत्रित क्षेत्र आहे आणि सरकारचे मार्ग विस्तारावर नियंत्रण नाही कारण ते विमान कंपन्यांवर अवलंबून आहे.
नागरी विमान वाहतूक क्षेत्र ‘हा’ एक सिझनल उद्योग आहे!
- सणासुदीच्या काळात हवाई तिकिटांच्या किंमतीत वाढ करण्याच्या प्रश्नावर मंत्री म्हणाले की नागरी विमान वाहतूक क्षेत्र हा सिझनल उद्योग आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.
- या किंमतीतील मागणीत सतत चढ-उतार होत असते.
- ऑक्टोबरमध्ये सणासुदीचा काळ सुरू होतो आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील मागणीची पातळी फेब्रुवारीपर्यंत जास्त असते आणि नंतर थोडीशी घट होते. पावसाळ्यात मागणी कमी होते.
- कोरोना महामारीच्या काळात हे क्षेत्र अत्यंत वाईट टप्प्यातून गेले. एअर टर्बाइन इंधन हा तिकीट दरात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावर ५० टक्के खर्च येतो.
अमृतसर आणि चंदीगडमध्ये सुमारे सात देशांसाठी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी- ज्योतिरादित्य सिंधियांनी दिली माहिती
- अमृतसर आणि चंदीगडला ब्रिटन, कतार, दुबई, मलेशिया, शारजा, सिंगापूर आणि इटली या सात देशांशी आंतरराष्ट्रीय ‘कनेक्टिव्हिटी’ आहे.
- ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, हवाई सेवा वाहतूक करारांमध्ये आम्ही भारतातील फक्त सहा महानगरांना कनेक्टिव्हिटी देतो. आम्ही आमचा देश त्यांच्यासाठी खुला करू शकत नाही.
- आपण भारतीय विमानसेवाही मजबूत करायला हवी.
- मला कळवायला आनंद होत आहे की आता भारतीय विमान कंपन्यांना मोठी विमाने मिळत आहेत.
- थेट संपर्काच्या दृष्टीने आम्ही आमचा भारतीय ध्वज जगभर फडकवणार आहोत.