मुक्तपीठ टीम
मनोरंजन…मनोरंजन…मनोरंजन, बॉलीवूडच्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर भूरळ घातली आहे. फक्त भारतीयच नाही तर परदेशी लोकांनाही हिंदी चित्रपटांचे वेड आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत जे खूप लोकप्रिय आहेत पण त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही. त्यांचा जन्म भारतात झाला नसला तरी, ते आता देसी झाले आहेत. काही बॉलीवूड कलाकार भारतीय नसले तरी त्यांनी भारतीय प्रेक्षकांचे ते चाहते आहे. आज अशाच काही स्टार्सबद्दल जाणून घेवूया ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही, त्यामुळे त्यांना देशात मतदानाचा अधिकारही नाही आहे.
दीपिका पदुकोण
- बॉलीवूडच्या सुंदर आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला आहे.
- तिच्याकडे डॅनिश नागरिकत्व आहे.
- दीपिकाला भारतात मतदानाचा अधिकार नाही.
अक्षय कुमार
- अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.
- त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
- भारतात त्यांच्या चाहत्यांची कमतरता नाही.
- अक्षय कुमार हे सोशल मीडियावर सुपरअॅक्टिव्ह असतात आणि प्रत्येक मुद्द्यावर अत्यंत निर्दोषपणे मत व्यक्त करतात.
- अक्षय कुमारला भारतात मतदानाचा अधिकार नाही.
आलिया भट्ट
- बॉलीवूडची बबली अभिनेत्री आलिया भट्टने सर्वांची मने जिंकली आहेत.
- आलियाची आई सोनी राजदान बर्मिंघम यूकेची असून त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.
- आईप्रमाणे आलियाकडेही ब्रिटिश नागरिकत्व आणि पासपोर्ट आहे.
- तिलाही भारतात मतदानाचा अधिकार नाही.
जॅकलिन फर्नांडिस
- श्रीलंकेच्या माजी मिस युनिव्हर्स जॅकलीन फर्नांडिस यांचा जन्म मनामा (बहारिन) येथे झाला आहे.
- तिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.
- जॅकलिनचे वडील एलरॉय फर्नांडिस हे श्रीलंकन तमिळ आहेत.
- तिची आई किम मलेशियाची आहे.
- जॅकलिनने ऑस्ट्रेलियातून शिक्षण घेतले आहे.
- तिच्याकडेही भारतीय नागरिकत्व नाही आणि तिला भारतात मतदानाचाही अधिकार नाही.
कतरिना कैफ
- कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला.
- कतरिना ही ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे तिला भारतात मतदानाचा अधिकार नाही.
- कतरिनाच्या पासपोर्टमध्येही तिचे नागरिकत्व ब्रिटनचे आहे.
- कतरिनाचे वडील काश्मीरचे आहेत, तरही ती भारताची नागरिक नाही.