मुक्तपीठ टीम
आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. आता मुले मैदानात किंवा उद्यानात जाण्याऐवजी घरी बसून स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर गेम खेळण्यास प्राधान्य देत आहेत. ऑनलाइन गेमिंगची गेल्या अनेक वर्षांत क्रेझ खूप वेगाने वाढली आहे. मुलांच्या या सवयींमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होत आहेत. हा दुष्परिणाम लक्षात घेऊन भारतात अनेक प्रकारच्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे आणि दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच एका निवेदनात सांगितले की,’केंद्र सरकार लवकरच ऑनलाइन गेमशी संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहे’.
काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव?
- केंद्र सरकार लवकरच ऑनलाइन गेमशी संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहे
- ते म्हणाले की, यासाठी त्यांनी त्या सर्व राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठक घेतली आहे.
- प्रत्येक राज्याने ऑनलाइन गेमिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे.
- लोकांना ऑनलाइन गेमचे व्यसन लागले आहे व ते विचित्र पद्धतीने वागत आहेत.
- त्यांच्या या वागण्यामुळे समाजातील एकोपाही प्रभावित होत आहे.
कोणते नवीन नियम लागू होणार?
- लवकरच यासंदर्भात योग्य आणि आवश्यक कायदा आमलात येईल.
- यामध्ये कायदा किंवा नियम देखील समाविष्ट असू शकतात.
- केंद्र लवकरच डेटा बिल आणि डिजिटल इंडिया विधेयक आणत आहे.
- या डेटा बिलालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- हे डेटा बिल जगासाठीही एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.