मुक्तपीठ टीम
हिवाळ्यात ज्यांनी मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगला जाणे बंद केले होते, आता हवामान बदलल्यानंतर पुन्हा जाण्यास काहीच हरकत नाही. रोज फक्त अर्धा तास चालल्याने शरीर तर तंदुरुस्त राहतेच शिवाय हृदयरोग, मधुमेह, स्थूलपणा यांसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो. मात्र, हे सगळे करताना पुढील गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
१. फिटनेस बँडचा वापर करा
व्यायाम अथवा चालणे मजेशीर करण्यासाठी फिटनेस बँड अवश्य वापर करा. प्रत्यक्षात फिटनेस बँडचा उपयोग तुम्ही किती धावलात, किती पावले चाललात, हृदयाच्या ठोक्यांची स्थिती, किती व्यायाम केला व केव्हा पाणी प्यावे हे तपासण्यासाठी होतो. याने व्यायाम करण्यास प्रोत्साहन मिळतेच शिवाय प्रोग्रेस ट्रॅक रेकॉर्ड करता येतो.
२. पाण्याची बाटली कायम सोबत ठेवा
धावताना घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सोबत पाणी असणे आवश्यक आहे. अधूनमधून पाणी पियाल्याने धावताना स्नायूंवरील ताण कमी होतो आणि स्टॅमिना चांगला राहतो.
३. गाणी ऐका
धावताना गाणी ऐकल्याने थकवा जाणवत नाही. ते दिसायलाही कूल दिसते. तसेच व्यायाम करताना एनर्जी मिळते.
४. योग्य शूजची निवड करणे आवश्यक
शूजची निवड चुकल्यास धावताना गुडघे आणि कमरेला त्रास होऊ शकतो. चालण्यासाठी वेगळ्याप्रकारे शूज डिझाईन केले जातात, ज्यामध्ये घाम रोखण्यासाठी आणि ऑक्सिजनच्या मोकळ्या प्रवाहासाठी विशिष्ट रचना केलेली असते. ते वजनालाही हलके असतात.
चालण्याचे काही फायदे
- चालल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त फॅट बर्न करता येतात, ज्यामुळे शरीरातील जास्तीचे कॅलरीज बर्न होतात व तुम्ही फिट दिसता.
- दररोज ३० मिनिटे चालल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते, ब्लड सर्क्युलेशन वाढते, ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेहा इत्यादी चा धोका कमी होतो.
- शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, झोप चांगली लागते आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट राहता.