Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विनियोजन विधेयकांच्या कार्यवाही संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

December 16, 2022
in सरकारी बातम्या
0
Hon’ble Cm Sir meeting regarding Costal Road Meeting 1

मुक्तपीठ टीम

पावसाळी अधिवेशनातील विनियोजन विधेयकांच्या कार्यवाहीसंदर्भात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

पावसाळी अधिवेशनात विनियोजन विधेयकावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीबाबत  सह्याद्री अतिथी गृह येथे आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनूप कुमार, प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. अश्विनी जोशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संजय खंदारे आदीसह उच्च व तंत्र शिक्षण, गृह, सामान्यप्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पर्यटन विभागाने शास्त्रशुद्ध पद्धतीने गड-किल्ल्यांचे संवर्धन होईल यासाठी व्यवस्थापनासंदर्भात आराखडा तयार करून, मंजूरी  मिळतील त्याप्रमाणे ती कामे पूर्ण करावीत. वैद्यकिय शिक्षण विभागाने सातारा वैद्यकिय महाविद्यालयाचे बांधकाम तातडीने सुरू करावे. तसेच अलिबाग वैद्यकिय महाविद्यालयासाठी स्थानिक स्तरावरील समस्या सोडवून पुढील कार्यवाही करावी. वैद्यकिय महविद्यालयासाठी स्टाफ नेमण्यासाठी पदभरतीस मान्यता देण्यात आली असून, त्यानुसार  पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाने मेडिकल इंडस्ट्रियल पार्क संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री यांनी आश्वासित केलेली कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजी राजे शौर्य पुरस्काराचे निकष ठरवणारी समिती तात्काळ गठीत करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सहकार विभागाने जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारणे, मुंबईतील पशुवैद्यकिय महाविद्यालयासंदर्भात वास्तूविशारद नेमून पुढील कार्यवाही करावी. याचबरोबर कृषी, गृह, सहकार व पणन, उच्च शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागासही प्रलंबित व सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.


Previous Post

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) च्या ऑनलाईन सिंगल विंडो पोर्टलचे उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्घाटन

Next Post

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
Hon’ble Cm Sir at Loksatta Real Estate Conclave 2022 1

दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!