Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत १९ वर्षांनी ‘ऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप’ स्पर्धा

December 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Optimist Asian and Oceanian Sailing Championships

मुक्तपीठ टीम

तब्बल १९ वर्षानंतर भारतात होणाऱ्या ऑप्टीमिस्ट एशियन अॅण्ड ओशिनियन नौकानयन चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेचे उद्घाटन आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रिय मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल हरमिंदर सिंग कहलॉन यांच्या हस्ते आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले. १५ डिसेंबरपासून मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.

सन २००३ नंतर भारताला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, चीन, जपान, श्रीलंका, थायलंड, युएई, बेल्जियम, मॉरिशस, तुर्की, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया या १३ देशांनी सहभाग घेतला आहे. आर्मी यॉटिंग नोडमधील महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सेल ऑप्टीमिस्ट, यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) आणि नॅशनल ऑप्टीमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एनओएए) यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. सर्व १० शर्यती दररोज प्रति फ्लीट जास्तीत जास्त तीन शर्यतींसह आयोजित केल्या जातील. १९ डिसेंबर २०२२ रोजी ठाकर्स, चौपाटी, मुंबई येथे स्पर्धेचा समारोप होईल.

उद्घाटनप्रसंगी से.नि. कॅप्टन अजय नारंग, विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भरत नाट्यम नृत्यकलेचे सादरीकरण करण्यात आले. यादरम्यान स्पर्धेत जगभरातील १३ सहभागी देशातील १०५ खलाशी आणि प्रशिक्षकांचा परिचय देण्यात आला. यावेळी क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, उपसचिव सुनील हांजे यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


Tags: good newsmuktpeethmumbaiOptimist Asian and Oceanian Sailing Championshipsऑप्टीमिस्ट एशियन आणि ओशेनियन नौकानयन चॅम्पियनशिप स्पर्धाघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठमुंबई
Previous Post

ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी जिल्‍हा वार्षिक योजनेत तीन टक्‍के निधी राखीव असणार

Next Post

‘हे’ iPhone वापरता? iOS अपडेट करा, 5G मिळवा!

Next Post
5G iOS 16 Beta Software Update

'हे' iPhone वापरता? iOS अपडेट करा, 5G मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!