मुक्तपीठ टीम
पृथ्वीवरील सर्वात लहान दिवसाला हिवाळी संक्रांती म्हणतात. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असे म्हणतात. दिवस मोठा होण्याची प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू होते ती अगदी २१ जूनपर्यंत सुरु असते. त्यामुळेच २२ डिसेंबरची रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान असतो. अस का? चला जाणून घेऊया यामागची संपूर्ण कहाणी…
संक्रांती एक खगोलीय घटना…
- संक्रांती ही एक खगोलीय घटना आहे जी दोनदा येते.
- एकदा उन्हाळ्यात आणि एकदा हिवाळ्यात.
- दरवर्षी जेव्हा सूर्य उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावरून दिसतो तेव्हा वर्षातील सर्वात मोठा दिवस २१ जून असतो.
- या दिवशी सूर्याची किरणे दीर्घकाळ राहतात.
- २२ डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो.
- या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर थोड्या काळासाठी राहतात.
- हे वर्षाचे दोन दिवस आहेत ज्यात दिवस आणि रात्रीच्या लांबीमध्ये कमालीचा फरक आहे.
- ही खगोलशास्त्रीय सामान्य घटना आहे, जी दरवर्षी घडते.
- खगोलशास्त्रज्ञांसाठी हे खूप खास आहे.
जगातील एका प्रदेशात सर्वात मोठा दिवस तर दुसऱ्या प्रदेशात सर्वात लहान दिवस
- हिवाळी संक्रांतीच्या वेळी, सूर्याची किरणे दक्षिण गोलार्धात जास्त आणि उत्तर गोलार्धात कमी पडतात.
- यामुळे उत्तर गोलार्धात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो.
- दक्षिण गोलार्धात, या दिवशी सूर्य सर्वात जास्त काळ राहतो.
- अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होत आहे.
- पृथ्वीच्या स्थितीमुळे, आजचा दिवस एका क्षेत्रात सर्वात मोठा दिवस आहे.
- तर, दुसऱ्या भागात सर्वात लहान दिवस आहे.
- इतर ग्रहांप्रमाणे, पृथ्वी देखील २३.५ अंशांवर झुकलेली आहे.
- झुकलेल्या अक्षावर पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्याची किरणे एका ठिकाणी जास्त आणि दुसऱ्या ठिकाणी कमी पडतात.