Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जी-२० प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख! हॉटेल ताज पॅलेस येथे दिमाखदार आयोजन!!

December 14, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आज हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजन 1

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जी-२० प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आज हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जी – २० परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह जी-२० परिषदेसाठी मुंबईत आलेल्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.            

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संकल्पना “वसुधैव कुटुंबकम” असून जी-२० परिषद १३ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी-२० च्या प्रतिनिधींना आणि बैठकांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना संपूर्ण वर्षभर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसाचे दर्शन होणार आहे.            

महाराष्ट्राचा संपन्न वारसा, महाराष्ट्रातील संस्कृती, महाराष्ट्रातील वेगवेगळया परंपरा, वाटचाली आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख जी-२० परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलांवर आधारीत गेट वे ऑफ इंडिया येथील हॉटेल ताज पॅलेस येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर गेट वे ऑफ इंडियाजवळ विशेष लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी पुणेरी ढोल पथकाने सादरीकरण केले.            

या परिषदेसाठी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती व परंपरा याची माहिती महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यकमातून देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस  महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा याची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.            

गणेश वंदना आणि पुणेरी ढोलच्या माध्यमातून जी-२० परिषदेसाठी मुंबईत आलेल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय नृत्यापासून सुरुवात करण्यात आली. यानंतर मुंबईची ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपरिक वेशातील कोळी नृत्यही सादर करण्यात आले.            

या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी संगीत वाद्यांची जुगलबंदी, सुफी नृत्य, शास्त्रीय संगीत व लोकगीत यांचे सुरेख सादरीकरण केले. महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती असलेले लावणी, गोंधळ, जोगवा यांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रतिनिधींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.            

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जी-२० परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी हॉटेल ताज पॅलेसमध्ये खास मेजवानीचा आस्वाद घेतला. यानंतर प्रतिनिधींनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरफटका मारला. उपस्थित सर्व मान्यवरांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित करण्यात आलेल्या लाईट शोचा आनंद घेतला.            

या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,कायदा व सुव्यवस्था पोलीस सहायुक्त विश्वास नांगरे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.


Tags: G20Maharashtraजी-२०जी-२० प्रतिनिधीमहाराष्ट्रहॉटेल ताज पॅलेस
Previous Post

पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे

Next Post

भारत x चीन: जाणीवपूर्वक कसा काढतो चीन कुरापती? आता यांगत्सेमध्ये का घुसखोरी?

Next Post
Tawang Clash

भारत x चीन: जाणीवपूर्वक कसा काढतो चीन कुरापती? आता यांगत्सेमध्ये का घुसखोरी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!