Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घराच्या छतावर सोलर बसवा, केंद्र सरकारच्या योजनेतून ४० टक्के अनुदान मिळवा!

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
solar power,

मुक्तपीठ टीम

काळानुसार, माणसाचे राहणीमान बदलले. बदलत्या राहणीमानामुळे खर्च ही तितकाच वाढला. उन्हाळ्यात माणसाला एसीची किंवा कुलरची गरज पडू लागली तर, थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्यासाठी गीझरची गरज लागली. यामुळे वीज बिल वाढले. सवयी पोटी काही करूही शकत नाही, परंतु, बहुतांश लोक या सवयींमुळे त्रस्त झाले आहेत. या विद्युत उपकरणांव्यतिरिक्त, दररोज अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यात येतो, ज्यामुळे वीज मीटरचा वेग वाढतो. अशा परिस्थितीत, वीजेचा कमी वापर करता बचत कशी करता येईल हा प्रश्न पडतो. पण काळजी नको. सध्या जिकडे तिकडे सोलरचा वापर होतो. सोलरचा वापर हा उपयुक्त ठरतो. केंद्र सरकारही या योजनेला पाठिंबा देत काही लाभ देते.

सोलर म्हणजेच हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी घराच्या छतावर सोलर पॅनल लावले तर, केंद्र सरकार अनुदान देत ​​आहे. केंद्र सरकारच्या सोलर रुफटॉप योजनेंतर्गत ४० टक्के अनुदान दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ किलोवॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी सुमारे ६० ते ६५ हजार रुपये खर्च येतो. सौर पॅनेल व्यतिरिक्त, वायरिंग, स्विचिंगसाठी एमसीबी इत्यादी इतर काही उपकरणे खरेदी करण्यासाठी काही इतर खर्चही असू शकतो.

सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सौर रूफटॉप योजना!

  • देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून सौर रूफटॉप योजना राबविली जात आहे. . डिस्कॉम्समध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्यांकडून कोणीही त्याच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकतो.
  • त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करता येईल.
  • या योजनेंतर्गत, जर डिस्कॉममध्ये सामील असलेल्या विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित केले तर ते ५ वर्षांसाठी रूफटॉप सोलरच्या देखभालीसाठी देखील जबाबदार असतील.

सोलर रूफटॉप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

  • https://solarrooftop.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करा
  • Apply for Solar Rooftop वर जा
  • आणखी एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे राज्यानुसार लिंक निवडा.
  • यानंतर फॉर्म उघडेल, ज्यामध्ये सर्व तपशील भरा.
  • सौर पॅनेल बसवल्यानंतर ३० दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

सबसिडीचा फायदा घेऊन घरपोच सोलर पॅनल बसवल्यास आपल्या गरजेनुसार सहज वीज निर्मिती करता येईल. यासाठी केंद्र सरकारकडून चांगले अनुदानही मिळेल. घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करायची असेल, तर सर्वप्रथम घरात चालणाऱ्या विद्युत उपकरणांची यादी तयार करावी लागेल. किती युनिट विजेची गरज भासते यानुसार, सौर पॅनेल बसवता येतात.

सोलर रुफटॉप योजनेला ४० टक्के अनुदान!

  • सोलर रूफटॉप योजनेंतर्गत, सौर पॅनेल बसविण्यावर ४० टक्के अनुदान दिले जाते.
  • ३ किलोवॅटपर्यंतचे सोलर रुफटॉप पॅनल बसवल्यास केंद्र सरकार ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देईल.
  • दुसरीकडे, जर १० किलोवॅटपर्यंतचे सौर पॅनेल लावले तर २० टक्के अनुदान मिळेल.

Tags: central GovernmentCentral Government Schemegood newsmuktpeethRooftop Solarsolar powersubsidyअनुदानकेंद्र सरकारकेंद्र सरकार योजनाघडलं-बिघडलंघराच्या छतावर सोलरचांगली बातमीमुक्तपीठसोलर पावर
Previous Post

माझी वसुंधरा अभियान २.०: सांगलीचा राज्यात दुसरा क्रमांक, शासनाकडून ७ कोटींचे बक्षीस!

Next Post

टेस्लाचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक! डिझेल ट्रकपेक्षा ३ पट अधिक पॉवरफूल!!

Next Post
Semi Tesla

टेस्लाचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक! डिझेल ट्रकपेक्षा ३ पट अधिक पॉवरफूल!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!