मुक्तपीठ टीम
दिल्ली महानगरपालिकेवर गेली १५ वर्षे सत्ता गाजवणाऱ्या भाजपावर आम आदमी पक्षाने एमसीडी निवडणुकीत विक्रमी विजय नोंदवला. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप पक्षाने २५० पैकी १३४ जागा जिंकल्या. तर भाजपाला फक्त १०४ जागा मिळाल्या आहेत. एमसीडी निवडणुकांतील विजयामुळे दिल्ली आता पूर्णपणे आम आदमी पक्षाच्या ताब्यात गेली आहे, असे म्हणता येईल. दिल्लीच्या लोकांनी यावेळी भाजपाची सत्ता नकारत ‘आप’ला का आपलं म्हटलं?
दिल्लीकरांनी ‘आप’ला का म्हटलं आपलं? चला जाणून घेवूया यामागची १० कारणे…
- १ ) दिल्लीत महापालिका निवडणुका झाल्या. यापूर्वी महापालिकेची उत्तर, पूर्व आणि दक्षिण झोन अशा तीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती. भाजपाच्या १५ वर्षांच्या सत्तेला यावेळी सत्ताविरोधीचा सामना करावा लागला.
- २) अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने निवडणुकीत पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपाचा पराभव केला आहे.
- ३) आम आदमी पार्टीने दिल्लीत ७ निवडणुका लढवल्या. ज्यामध्ये चार जिंकले तर तीनमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
- ४) एमसीडी निवडणुकीत आप आणि भाजपामधील मतांच्या शेअरमधील फरक केवळ ३ टक्के होता.
- ५) २०१७ च्या एमसीडी निवडणुकीच्या तुलनेत, आपने सुमारे १६ टक्के मते मिळविली. तर भाजपाने आपला मूळ मतदारसंख्या कायम ठेवली असून त्यात ३ टक्क्यांची भर पडली आहे.
- ६) एमसीडीमधील भ्रष्टाचार हा एक प्रमुख निवडणूक मुद्दा होता. आम आदमी पक्षाने मोठा निवडणूक प्रचार केला. भाजपाने दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांच्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप ठळक करून ‘आप’ला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
- ७) सत्येंद्र जैन यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शकूर बस्ती येथील सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणी बाग या तीनही महापालिका प्रभागांमध्ये भाजपाने विजय नोंदवला आहे.
- ८) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा विधानसभा मतदारसंघ पटपरगंजमध्ये भाजपाने चारपैकी तीन एमसीडीवॉर्ड जिंकले. भाजपाने विनोद नगर, मांडवली आणि मयूर विहार फेज २ घेतला. चौथा, पटपडगंज प्रभाग आपकडे गेला.
- ९) २०१७ च्या एमसीडी निवडणुकांपासून, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी सुमारे ११ टक्क्यांनी घसरली आहे. यावेळी काँग्रेसला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत.
- १०) मुस्लिम मते आप आणि काँग्रेसमध्ये विभागली गेली आहेत. यामुळे भाजपाला अनेक वॉर्डामध्ये फायदा झाला आहे.