Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जर्मनीत सरकार उलथू पाहणारे ‘हे’ नवनाझी कोण?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Germany Armed Insurrection Plan

मुक्तपीठ टीम

जर्मनीत सशस्त्र उठावाची योजना आखल्याचा संशय असलेल्या अतिउजव्या अतिरेक्यांच्या विरोधात हजारो पोलीस अधिकाऱ्यांनी जर्मनीच्या बहुतांश भागात छापे टाकले. या अतिरेक्यांना सरकार उलथून टाकायचे होते. या छाप्यात पोलिसांनी राईशबर्गर या अतिरेकी गटाशी संबंधित २५ जणांना अटकही केली आहे. हे लोक बळाच्या माध्यमातून देशातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.

या संशयित अतिरेक्यांवर कारवाई करताना, ३ हजार अधिकाऱ्यांनी देशातील १६ पैकी ११ राज्यांमधील १३० ठिकाणी शोध घेतला. या कारवाईत २२ जर्मन नागरिक आणि एका रशियनसह ३ जणांना दहशतवादी गटात सदस्यत्व असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.

जर्मन सरकार पूर्ण ताकदीने करणार कारवाई!

  • राईशबर्गर गटाचे सदस्य जर्मनीला कायदेशीर राज्य मानत नाहीत.
  • यातील काही लोक जर्मन साम्राज्याच्या राजेशाहीला भुललेले आहेत तर, काही लोक नाझी विचारसरणीने प्रेरित आहेत.
  • यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे की जर्मनी अजूनही सैन्याच्या ताब्यात आहे.
  • तसेच या प्रकरणात रशियाच्या सहभागाचा प्रश्नच उद्भवत नाही. याप्रकरणी कायद्यानुसार पूर्ण ताकदीनिशी कारवाई केली जाईल, असेही जर्मन सरकारने म्हटले आहे.

सरकारचे प्रवक्ते स्टीफन हेबस्ट्रेट यांनी माहिती दिली की, “आम्ही सध्या एका गटाबद्दल बोलत आहोत ज्याने जर्मन संसदेच्या इमारतीवर सशस्त्र हल्ला केला आणि देशाच्या लोकशाही राज्य कायद्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांमध्ये ७२ वर्षीय निवृत्त लष्करी कमांडर आणि उजव्या पक्षाच्या माजी खासदाराचाही समावेश आहे.”

जर्मनीच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, “अतिउजव्या अतिरेकी गटाला हिंसक बंडाच्या विचारसरणीने प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे अनुयायी जर्मनीतील युद्धोत्तर संविधान नाकारत आहेत आणि देशभरात निवडून आलेले सरकार उलथून टाकण्याची मागणी करत आहेत.”


Tags: armed coupGerman GovernmentGermany Armed Insurrection PlanmuktpeethReichsberger Extremist Groupघडलं-बिघडलंजर्मन सरकारजर्मनी सशस्त्र उठाव योजनामुक्तपीठराईशबर्गर अतिरेकी गट
Previous Post

विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १८६८ कोटी ६४ लाख नुकसानभरपाईचे वितरण – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

TIME मॅगझिनने युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना ‘मॅन ऑफ द इयर’ का निवडलं?

Next Post
Ukraine President Volodymyr Zelensky

TIME मॅगझिनने युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना 'मॅन ऑफ द इयर' का निवडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!