मुक्तपीठ टीम
”NOTA” किंवा ”वरीलपैकी काहीही नाही” हा भारतीय मतदारांना निवडणुकीत प्रदान केलेला मतपत्रिका पर्याय आहे. नोटाद्वारे, नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा अधिकार आहे. नोटा म्हणजे काय? लोक नोटा पर्याय का निवडता? मतदान यंत्रावर नोटा हा पर्याय कुठे असतो? याबद्दल तपशीलवार जाणून घ्या…
नोटाचा अर्थ काय आहे?
- जर कोणत्याही राजकीय पक्षाला मत द्यायचे नसेल, तर ‘वरीलपैकी काहीही नाही’ साठी मतदान करण्याचा पर्याय आहे, ज्याला नोटा असेही म्हणतात.
- नोटा म्हणजे ‘नन ऑफ द अबव्ह’ जे मतदाराला निवडणुकीत सहभागी होणाऱ्या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराची निवड करू देत नाही.
- हे एक प्रकारचे नकारात्मक अभिप्राय तंत्र आहे.
- मतदारांना जसा निवडण्याचा अधिकार आहे, तसाच नोटा त्यांना नाकारण्याचाही अधिकार देतो.
नोटा पहिल्यांदा कधी वापरण्यात आला?
-२०१३ मध्ये छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा नोटा पर्यायाचा वापर करण्यात आला होता.
-१५ लाखांहून अधिक लोकांनी नोटाला मतदान केले होते.
EVM मध्ये हा पर्याय कुठे आहे
-इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) मध्ये उमेदवार यादीच्या शेवटी नोटाचा पर्याय असतो.
-नोटा लागू करण्यापूर्वी, मतदाराला नकारात्मक मत देण्यासाठी मतदान केंद्रावरील पीठासीन अधिकाऱ्याला कळवावे लागते.
-आता, नोटा मतदानासाठी पीठासीन अधिकाऱ्याच्या सहभागाची आवश्यकता नाही.
-आता मतदार फक्त ईव्हीएमवरील बटण दाबू शकतो.
नोटाची लोकप्रियता
-नोटा हे एक साधन आहे जे मतदारांना पक्षांच्या उमेदवारांच्या योग्यतेबद्दल त्यांचे अभिप्राय रेकॉर्ड करण्याचा पर्याय देते.
-नोटा पर्याय गेल्या काही वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय होत आहे.