मुक्तपीठ टीम
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड-ए या पदांसाठी एकूण ४ हजार ५०० जागांसाठी नोकरीची संधी आहे. या पदांसाठी होणारी परिक्षा टियर-१ ही फेब्रुवारी/ मार्च २०२३ पर्यंत होणार आहे तर, टियर-२ या परिक्षेबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीचे ठिकाण
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/19d0eWLL7d-ho_6JPAegWaH04_pgp3DUf/view








Subscribe