मुक्तपीठ टीम
आजचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे. इंटरनेटवर बरेच चांगले आणि वाईट अनुभव पहायला मिळतात. गुगलच्या एक्स एमडी परमिंदर सिंग यांनी असाच अनुभव त्यांनी अनुभवलं आहे. दिल्ली विमानतळावर घाई-घाईमुळे कॅब ड्रायव्हरला पैसे देण्यास विसरले आणि कॅब ड्रायव्हर माझ्याशी ज्या प्रकारे बोलले ते सगळ्यांचे हृदय कसे जिंकेल आणि मानवतेवर विश्वास कसा बळकट करेल हे दर्शवणारे होते. हा अनुभव सांगण्यासाठी त्यांनी ट्विटरचा उपयोग केला. टॅक्सी ड्रायव्हरचं एवढं मोठं मन त्यांना आवडला.
The soft spoken cab driver dropped us at Delhi airport. We walked off without paying. Desperately called to ask how to pay & he replied, ‘Koi baat nahi, phir kabhi aa jayenge’. Won’t even tell the amount. He knew we don’t live here. We eventually paid him & learnt decency exists.
— Parminder Singh (@parrysingh) December 3, 2022
गूगलच्या माजी एमडींकडून ट्विट करत भारतीय कॅब ड्रायव्हरचे कौतुक…
- गूगलचे माजी एमडींने त्यांच्यासोबत दिल्ली विमानतळावर झालेली घटना शेअर करण्यासाठी त्यांनी ट्विटरचा उपयोग केला.
- ट्विटमध्ये परमिंदर सिंह यांनी सांगितले की ते कॅब ड्रायव्हरला पैसे देण्यास कसे विसरले.
- दिल्ली विमानतळावरून विमान पकडण्याची घाई होती आणि तेव्हा ते पैसे देण्यास विसरले.
- चूक लक्षात येताच त्ंयानी ताबडतोब कॅब ड्रायव्हरला बोलावले आणि पैसे दिले.
- त्या नंतर कॅब ड्रायव्हरकडून मिळालेला प्रतिसाद बर्याेपैकी अविश्वसनीय आणि असामान्य होता.
असा होता कॅब ड्रायव्हरचा प्रतिसाद…
- दिल्ली विमानतळावर, जेव्हा परमिंदर सिंग कॅब ड्रायव्हरला पैसे न देता घाईत निघून गेले, तेव्हा त्यांनी ताबडतोब कॅब ड्रायव्हरला बोलावले आणि पैसे किती झाले विचारले.
- उत्तर देताना, कॅब ड्रायव्हरने परमिंदर सिंगला सांगितले की- काही हरकत नाही, पुन्हा कधी याल’.
- रक्कमही सांगणार नाही.
- पुढे, परमिंदर सिंग म्हणाले की कॅब ड्रायव्हरला हे माहित होते की आम्ही येथे राहत नाही.
- अखेर परमिंदर सिंग यांनी त्याला पैसे दिले.
- चांगली माणसं आजही अस्तित्त्वात आहेत हे त्यांना समजले.
- हा सगळा अनुभव त्यांनी ट्विट करत शेअर केला.
परमिंदर सिंगच्या ट्विटला ६०० हून अधिक लोकांची पसंती…
- परमिंदर सिंगबद्दल यांच्या ट्विटरवर २५,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.
- त्यांनी शेअर केलेल्या ट्विटला ६०० हून अधिक पसंती आणि खूप प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहेत.
- लोकांनी ड्रायव्हरने दर्शविलेल्या हावभावाचे कौतुक केले.
- लोकांनी कौतुक केली की चांगले लोक अजूनही आपल्यात उपस्थित आहेत.