मुक्तपीठ टीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिव्हा निमित्त पूर्वसंध्येला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्त्यांना संविधानाची शपथ देण्यात आली.
भारतामध्ये जातीयवाद मनुवाद, सनातनी धर्मांध शक्ती उन्माद करत आहेत. देशाचे संविधान नाकारून मनुस्मृतीचे समर्थक टोळीने काम करत आहे. म्हणून देशाला संविधानाची गरज आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करायचा असेल आणि लोकशाही मजबूत ठेवायचे असेल तर संविधानाचा संरक्षण आणि रक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानाची शपथ घेण्यात आली.
यावेळेस संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासंघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते पाटील, साहित्यिक लेखक चंद्रकांत हजारे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.