मुक्तपीठ टीम
कोरोनाचे आव्हान असूनही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पाश्चात्य लसी स्वीकारण्यास तयार नाहीत. चीनच्या अनेक भागांमध्ये कोरान लॉकडाऊन विरोधात निदर्शने सुरु आहेत. ही निदर्शने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षासाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
कॅलिफोर्नियातील वार्षिक रीगन नॅशनल डिफेन्स फोरममध्ये बोलताना, हाइन्स म्हणाले की विषाणूचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव असूनही, शी जिनपिंग हे पश्चिमेकडील अधिक चांगली लस स्वीकारण्यास तयार नाहीत आणि ते ओमिक्रॉनच्या विरूद्ध प्रभावी लसीवर अवलंबून आहेत. ते म्हणाले की चीनने कोणत्याही परदेशी कोरोना लसींना मान्यता दिलेली नाही.
शी जिनपिंग यांचा पाश्चात्य देशांकडून लस स्वीकारण्यास विरोध का?…
- ११ नोव्हेंबर रोजी चीनने कोरोना नियंत्रणासाठी २० सूत्रांचे नवीन धोरण जारी केले.
- यामध्ये क्वारंटाईन कालावधी कमी करणे.
- संपूर्ण शहर किंवा परिसराऐवजी फक्त संक्रमित भागात लॉकडाऊन लादणे.
- संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या लोकांवर लादलेले निर्बंध लूस करणे, इत्यादी उपायांचा समावेश आहे.
- या घोषणेनंतर कडकपणात शिथिलता मिळण्याची आशा लोकांमध्ये निर्माण झाली होती.
- परंतू लोकांच्या अपेक्षा चीन सरकारने भंग केल्या.
- चीनमध्ये कोरोना संसर्गाची नवीन लाट आली आहे.
- शनिवारी नवीन संसर्गाची ३९ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.
- एकीकडे लॉकडाऊनविरुद्ध वाढता असंतोष आणि दुसरीकडे संसर्गाच्या नव्या लाटेला तोंड देण्याचे नवे आव्हान.
- शी जिनपिंगच्या शून्य-कोरोना धोरणामुळे तीव्र आर्थिक मंदी आणि सार्वजनिक अशांतता निर्माण झाली आहे.
- चीनने कोणत्याही परदेशी कोरोना लसींना मान्यता दिलेली नाही.
- ते देशांतर्गत उत्पादित केलेल्या लसींची निवड करतात.
- व्हाईट हाऊसने आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की चीनने अमेरिकेकडे लस मागितल्या नाहीत.