मुक्तपीठ टीम
कारमधून फिरणं कोणाला आवडत नाही? प्रत्येकालाच आवडते. कार विकत घेणे हे ही प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा आपल्या स्वप्नातील कारला काही होऊ नये अशीच इच्छा सर्वांची असते. त्यावर थोडासा ओरखडाही आला तरी जीव टांगणीला लागतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, कारची टचस्क्रीन स्क्रॅच झाली असेल किंवा डिस्प्लेवर फिंगरप्रिंट्स पडले असतील तर त्या घालवण्सायाठी काही सोप्या टिप्स आहेत.
कारच्या टचस्क्रीनवर स्क्रॅच पडल्यास ‘या’ गोष्टी करा
१. टूथपेस्टने ओरखडे काढा
कारची टचस्क्रीन स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर केला जातो. एका मऊ कापडावर किंवा कापसावर टूथपेस्ट घ्या. यानंतर हळूहळू स्क्रॅचवर चोळा यावेळी, आवश्यकतेपेक्षा जास्त टूथपेस्ट वापरत नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. साफ केल्यानंतर, मऊ कापडाने पुसून टाका.
२. बेकिंग पावडरच्या मदतीने स्वच्छ करा
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्लेमधून ओरखडे साफ करण्यासाठी, बेकिंग पावडर देखील मदत करू शकते. यासाठी बेकिंग पावडरमध्ये थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट होईपर्यंत मिक्स करा. यानंतर एक मऊ कापड घ्या आणि पेस्टमध्ये बुडवा आणि नंतर हळूवारपणे स्वच्छ करा. ते सुकल्यानंतर मऊ कोरड्या कापडाने स्वच्छ करा.
३. स्क्रॅच-एलिमिनेशन क्रीम वापरा
यासाठी स्क्रॅच-एलिमिनेशन क्रीम देखील वापरता येते. हे देखील खूप उपयुक्त ठरू शकते. ही क्रीम मऊ कापडावर घ्या स्क्रीनवर १५ ते २० मिनिटे हलक्या हातांनी लावा, नंतर स्वच्छ कापडाने स्क्रीनवरील क्रीम काढून टाका. हे टच स्क्रीनचे स्क्रॅच मिटवण्यास मदत करेल.