मुक्तपीठ टीम
नाताळ येताच विद्यार्थ्यांना नाताळची सुट्टी असते त्यामुळे लोक सुट्टीसाठी शहराबाहेर जातात. नाताळ म्हटलं की लेकांचे पाय गोव्याकडे वळतात. नाताळ सण लक्षात घेत आयआरसीटीसीने नवीन गोवा पॅकेज सादर केला आहे. या पॅकेजमध्ये अनेक सुविधाही दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहे पॅकेजमध्ये…?
पॅकेज तपशील…
- पॅकेजचे नाव- ख्रिसमस स्पेशल गोवा गेटवे (EHA018A)
- पॅकेज कालावधी – ४ रात्र आणि ५ दिवस
- प्रवासाचे साधन – फ्लाइट मोड
- कव्हर केलेले गंतव्य – उत्तर आणि दक्षिण गोवा
- पॅकेजची तारीख – २२ डिसेंबर २०२२
- या सहलीत एकट्याने प्रवास करत असाल तर ५१,००० रुपये खर्च येईल.
- दोघांसाठी, प्रति व्यक्ती ४०,५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
- तीघांसाठी प्रति व्यक्ती ३८,१५० रुपये शुल्क भरावे लागेल.
- लहान मुलांना स्वतंत्र फी भरावी लागेल ३२,५०० बेडसह.
आयआरसीटीसीने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. जर नाताळची सुट्टी संस्मरणीय बनवायची असेल, तर आयआरसीटीसीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घ्या.