मुक्तपीठ टीम
अँड्रॉइड स्मार्टफोन यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. गुगलने सर्व अँड्रॉइड यूजर्ससाठी इशारा जारी केला आहे. गुगल रिसर्चरच्या रिपोर्टनुसार, अँड्रॉइड डिव्हाइसच्या ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) मध्ये एक बग सापडला आहे, त्यामुळे अँड्रॉइड स्मार्टफोन हॅकिंगचा धोका वाढला आहे. अँड्रॉइड स्मार्टफोन्समधील उच्च ग्राफिक्स गेमिंग स्मार्टफोन्समध्ये GPU वापरला जातो. गुगलचे स्मार्टफोन कंपन्यांना सर्तक राहण्यास सांगितले आहे.
काय आहे गुगलचा अलर्ट…
- गुगल संशोधक टीमला ARM Mali GPU ड्रायव्हरमध्ये बग सापडला आहे.
- चिप डिझायनर एआरएमला गुगलच्या टीमने जीपीयू बगबद्दल माहिती दिली.
- चिप डेव्हलपर्सनी या उणीवा दूर केल्या आहेत.
- सॅमसंग, शाओमी, ओप्पो आणि गुगलसह इतर स्मार्टफोन्सवर हॅकिंगचा धोका कायम आहे.
- हा बग जून ते जुलै २०२२ दरम्यान सापडला होता.
- एआरएमने जुलै आणि ऑगस्ट २०२२ मध्ये या कमतरता दूर केल्या होत्या.
- गुगलने सांगितले आहे की Mali GPU वापरून तपासलेल्या सर्व उपकरणांमध्ये बग अजूनही आहे.
सतर्क असणे आवश्यक!
- बगमुळे प्रभावित झालेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी सुरक्षा अद्यतने लवकरच उपलब्ध करून दिली जातील.
- स्मार्टफोन आणि चिप उत्पादक लवकरच हा सिक्युरिटी पॅक आणू शकतात.
- गुगलच्या अलर्टनुसार स्मार्टफोन कंपन्यांनी अशा बग्सपासून सावध राहण्याची गरज आहे.