Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र दालनाला पुरस्कार

November 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
India Trade Promotion Organization Institute

मुक्तपीठ टीम

यंदाच्या ४१व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून सहभागी झाले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाला ‘भागीदार राज्य’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील प्रगती मैदानात ४१वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरूवात १४ नोव्हेंबरपासून झाली होती. याचे समारोप रविवारी २७ नोव्हेंबरला झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र दालना’ ला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप खरोला यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विजय कपाटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘महाराष्ट्र दालन’ यावर्षी हॉल क्रमांक २, तळमजल्यावर मांडण्यात आले होते.

यावर्षीच्या व्यापार मेळयाची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” होती. ही संकल्पना मांडताना राज्याचे डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), बचत गट, स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसत होते. एकूण ४५ स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या निवडक विषयांवर स्टॉल्स उभारण्यात आले होते. बचत गटांचे, कारागिरांचे, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांतर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअपचे स्टॉल्स या ठिकाणी होते.

महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘महाराष्ट्र दिवस’ शनिवारी २६ नोव्हेंबरला येथील खुल्या सभागृहात झाला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.


Tags: 41st International Trade Fair४१वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावाgood newsIndia Trade Promotion Organization InstituteInternational Trade FairMaharashtra DalanmuktpeethPragati Maidanआंतरराष्ट्रीय व्यापार मेळावाइंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन संस्थाघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रगती मैदानमहाराष्ट्र दालनमुक्तपीठ
Previous Post

‘गामा फाऊंडेशन फिल्म्स’ आणि ‘छाया प्रॉडक्शन’च्या लघुपटांचे स्पेशल स्क्रिनिंग

Next Post

ऊर्जा मंत्रालय करणार ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी, महाराष्ट्रानेही दाखवले स्वारस्य!

Next Post
Ministry of Power

ऊर्जा मंत्रालय करणार ४५०० मेगावॅटची एकूण वीज खरेदी, महाराष्ट्रानेही दाखवले स्वारस्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!