अविनाश उषा वसंत / व्हा अभिव्यक्त!
साखरी नाटे. ४००० वा थोड्या कमी जास्ती लोकसंख्येचं गाव. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत. मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळतं. हे फक्त मासेमारीशी निगडित.
Long thread
हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१) pic.twitter.com/7znaD6WVHD— Avinash Usha Vasant (@aviuv) November 27, 2022
मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजारहून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील क्रमांक दोन नंबरचे मासे ह्या बंदरातून वहन होतात. असे का आहे? तर साखरी नाटे च्या आजुबाजुच्या समुद्रात प्रचंड मासे मिळतात, कारण अत्यंत स्वच्छ समुद्र आणि समुद्राखाली असणारे पान वनस्पतींचे जंगल. स्थानिक मच्छिमार सांगतात की गुजरात मुंबईहून मोठ्या बोटी साखरी नाट्याच्या आसपासच्या समुद्रात मासेमारी साठी येतात. राजकारणी नेहमी रोजगार रोजगार याच पालुपत लावत असतात.ते तर खोट आहेच पण ते दुट्टपी आहे. यासाठी हे लिहलय साखरी नाट्याच्या दक्षिणेला जैतापूर चा प्रकल्प प्रस्तावित आहे तर उत्तरेला प्रस्तावित बारसू रिफायनरी चे क्रूड ॲाईल टर्मिनल आणल गेलय. आणि स्थानिकांना रोजगार मिळेल याच्या आश्वासनावर. ह्या दोन्ही प्रकल्पांचा विचार केला तरी प्रत्यक्ष रोजगार हा ३० हजार च्या वर जात नाही. ह्या दोन्ही प्रकल्पांमुळे तात्काळ नाही पण प्रकल्प उभे झाल्यानंतर काही काळानंतर साखरी नाट्याची मासेमारी हळू हळू नष्ट होत जाणार आहे. आणि त्या मासेमारीच्या परिसंस्थेवर आधारीत ४० ते ५० हजाराचा रोजगार सुध्दा.
म्हणजे सरकारी धोरण किती उरफाटे असू शकतात यासारख वेगळ उदाहरण सापडू शकत नाही. परत विकासच्या गोंडस नावाखाली सुध्दा प्रकल्प हे समुद्र किनारी प्रदेशात नाहीतर जंगलाच्या आसपासच्या प्रदेशात लादले जातात.
पण साखरी नाट्याची आर्थिकता बघितली तर त्या गावाला वा त्याच्या जवळ अशा प्रकल्पांची गरज आहे का ज्या प्रकल्पांमुळे साखरी नाटे ची आर्थिकतेला मोठा धोका पोहचतो हा प्रश्न सतत पडत राहतो.