रोहिणी ठोंबरे
गौतमी पाटील हे नाव ऐकताच आठवतं ते तिचं लावणी नृत्य. सोशल मीडियावर तिच्याबाबत नेहमीच चर्चा होते. कधी तिच्या लावणीचं कौतुक होतं तर, कधी त्याच लावणीमुळे तिच्यावर टीका केली जाते. सध्या तिच्या डान्समधील हावभावामुळे ती चर्चेत आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर ठिकाणांहूनही तिला विरोध होत आहे. मात्र या घटनेपूर्वीच ते आपल्या उत्कृष्ट लावणी नृत्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. गौतमी गेल्या अनेक वर्षांपासून देश-विदेशात तिचे नृत्य सादरीकरण करत आहे.
यापूर्वी ती टिक टॉकवर तिचे डान्स व्हिडीओ अपलोड करत असे. टिक टॉकच्या बंदीनंतर ती सध्या तिच्या डान्सचे छोटे-छोटे व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करत आहे. लावणी नृत्य महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसिद्ध आहे.
गौतमीचे सुरुवातीचे आयुष्य
- गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला.
- गौतमीचे आई-वडील तिच्या जन्मानंतर वेगळे झाले.
- आई नोकरी करायची पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली.
- तिने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
- आईचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे ती शिक्षण सोडून नृत्याकडे वळल्याचे सांगते.
- नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता.
- मग हळूहळू ती कार्यक्रम करू लागली. जिथे प्रेक्षकांकडून तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.
गौतमी पाटीलची एकूण संपत्ती सध्या २० लाखांहून अधिक आहे. ज्यातील बहुतेक हिंसा तिच्या स्टेजवरील नृत्य सादरीकरणातून येतो.
गौतमी पाटीलचे सध्या इंस्टाग्रावर १ लाख ९९ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहे.