मुक्तपीठ टीम
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि नेते सचिन पायलट यांच्यातील वाद वाढत चालला आहे. २०१८पासून सुरू असलेला हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. राजस्थान काँग्रेसमधील या दोन दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील अंतर्गत वादविवाद वाढला आहे. अशोक गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही म्हटल्यानंतर दोन्ही नेत्यांच्या गटातील तणाव आणखी वाढला आहे.
गेहलोत आणि पायलट यांच्या वादावर काँग्रेसची कठोर भूमिका!
- अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सुरू असलेल्या वादावर काँग्रेसने कठोर भूमिका घेतली आहे.
- पक्षाने दोन्ही नेत्यांना इशारा दिला आहे.
- ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, राजस्थानमधील संघटना पक्षासाठी सर्वोपरि आहे आणि ती मजबूत करण्यासाठी आवश्यक असल्यास कठोर निर्णय घेण्यापासून मागे हटणार नाही.
- राजस्थानच्या प्रश्नावर आम्ही तो उपाय निवडू, ज्यामुळे आमची संघटना मजबूत होईल.
- गेहलोत आणि पायलट यांच्या गटात तडजोड करावी लागली तर तडजोड केली जाईल.
- तसेच, काँग्रेसला गेहलोत आणि पायलट दोघांचीही गरज आहे असेही ते म्हणाले.
गेहलोत आणि पायलट यांच्यात पुन्हा वादाचे कोणते कारण ठरले?
- एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत यांनी पायलट यांना देशद्रोही ठरवले आणि सांगितले की, त्यांनी २०२०मध्ये काँग्रेसविरोधात बंड केले होते.
- गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना प्रमुख करण्यात आले नाही.
- गेहलोत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम म्हणाले की, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत काही विशिष्ट शब्द वापरायला नको होते.
२०१८ पासून गेहलोत आणि पायलट यांच्यात वाद सुरूच…
- राजस्थानमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यापासून गेहलोत आणि पायलट यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण झाला आहे.
- मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीका करणे यात नवीन काही नाही.
- गेहलोत यांनी यापूर्वीही अनेकवेळा सचिन पायलटवर जोरदार टीका केली आहे.
- मात्र, नुकत्याच केलेल्या टीकेमुळे या वादात आणखी भर पडली.