मुक्तपीठ टीम
भारतीय स्टेट बँकेत प्रोजेक्ट डिजिटल पेमेंट्स मॅनेजर या पदासाठी ०५ जागा, प्रोडक्ट्स डिजिटल पेमेंट्स/ कार्ड्स मॅनेजर या पदासाठी ०२ जागा, प्रोडक्ट्स डिजिटल प्लॅटफॉर्म मॅनेजर या पदासाठी ०२ जागा, क्रेडिट एनालिस्ट मॅनेजर या पदासाठी ५५ जागा अशा एकूण ६४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१ ते ३- १) पदवीधर २) फायनान्स एमबीए/ पीजीडीबीए/ पीजीडीबीएम/ एमएमएस फायनान्स/ सीए/ सीएफए/ आयसीडब्ल्यूए ३) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.४- १) ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक किंवा एमसीए किंवा एमबीए/ पीजीडीएम २) ०५ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ ते ३ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर, पद क्र.४ उमेदवारांचे वय २५ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइट https://sbi.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.
पद क्र.१ ते ३ साठी नोकरीची लिंक
https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-23/apply
पद क्र.१ ते ३ साठी अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1-iGOyGgI25P0gc4TycT1c32JCzXWzHKH/view
पद क्र.४ साठी नोकरीची लिंक
https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2022-23-25/apply
पद क्र.४ साठी अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1CpDEW8b-hRkYrftxJxggD3H7YnkEANM9/view








Subscribe