मुक्तपीठ टीम
जागतिक मंदीमुळे जगभरातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अॅपल, ट्विटर, अॅमेझॉन आणि मेटासारख्या दिग्गज कंपन्यांनी मोठ्या संख्येने आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहेत. आता गुगल देखील दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. गुगलने आपल्या ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करून, जे कर्मचारी खराब कामगिरी करत आहेत त्यांना कामावरून काढले जाणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. मात्र, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
कर्मचारी कपात करण्यामागे ‘ही’ आहेत कारणं!!
- कंपनी एक नवी रँकिंग सिस्टीम वापरून त्यानुसार, खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे.
- सध्या, अल्फाबेटमध्ये सुमारे १ लाख ८७ हजार कर्मचारी काम करत आहेत.
- तर गुगलमधील एका कर्मचाऱ्याचा सरासरी वार्षिक पगार सुमारे २.४१ कोटी रुपये आहे.
- गुगलच्या नफ्यात घट झाली असून, कंपनीने तिसऱ्या तिमाहीत १३.९अब्ज डॉलर निव्वळ नफा नोंदवला.
- गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील नफ्यापेक्षा त्यात २७ टक्के घट झाली आहे.
- कंपनीच्या एकूण महसुलात फक्त सहा टक्क्यांनी वाढ होऊन ६९.१ अब्ज डॉलरवर गेला आहे.
HP: ६, ००० कामगारांना कामावरून काढणार
- टेक कंपनी HP Inc (Hewlett Packard) २०२४-२५ पर्यंत १२ टक्के म्हणजेच सहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकेल.
- पर्सनल कॉम्प्युटरची घटती मागणी आणि कमी होत असलेला महसूल पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
कामगार मंत्रालयाने अमेझॉनला समन्स पाठवले
- कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत समन्स पाठवले आहे.
- एम्प्लॉईज युनियन नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेटने अॅमेझॉन इंडियावर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत मंत्रालयाकडे तक्रार केली होती.
- त्यानंतर कंपनीला समन्स बजावण्यात आले.