Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित

November 24, 2022
in featured, चांगल्या बातम्या
0
Cultural Affairs Department

मुक्तपीठ टीम

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांसाठीच्या निवड समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारार्थी निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागामार्फत निर्गमित करण्यात आले.

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवड समिती पुनर्गठित

विठाबाई नारायणगांवकर पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. मंगलाताई बनसोडे करवडीकर, छाया अंधारे खुटेगावकर, प्रा. प्रवीण जाधव, प्रा. येागेश निकम, देवानंद माळी, डॉ. प्रकाश खांडगे या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार्थी निवड समिती पुनर्गठित

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारार्थी निवडण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. या समितीमार्फत संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य/ वाड्मय लिहिणाऱ्या लेखकास दरवर्षी ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष आणि सचिव हे सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. डॉ. अशोक कामत, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, आचार्य तुषार भोसले, डॉ. मुकुंद दातार, राजेश महाराज देगलुरकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३ वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीचे अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. उस्मान खाँ, डॉ. आश्विनी भिडे- देशपांडे, प्रभा अत्रे, प्रज्ञा देशपांडे, पं. अजय पोहनकर या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३ वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. व्ही. शांतराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे सदस्य सचिव असतील. राजदत्त, सई परांजपे, सुधीर नांदगांवकर, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्यांना राजकपूर जीवनगौरव आणि विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव, गोरेगाव चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव असतील. सुभाष घई, विवेक अग्निहोत्री, मोहन जोशी, मधुर भांडारकर, वेद राही या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 3 वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार निवड समिती पुनर्गठित

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठितकरण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. विक्रम गोखले, गिरीश ओक, अशोक समेळ, अशोक सराफ या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३ वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

निवड समिती पुनर्गठित

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी निवड समिती पुनर्गठित करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. अरविंद पिळगांवकर, शुभदा दादरकर, माधव खाडिलकर, भरत बलवल्ली या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३ वर्षासाठी किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनी गायन आणि संगीत क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केलेल्या मान्यवरांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

शासकीय सदस्य म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या समितीत अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीत सदस्य सचिव तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव हे सदस्य असतील. पंडित ब्रिज नारायण, पंडित सत्यशिल देशपांडे, पंडित उल्हास कशाळकर, अशोक पत्की, अंबरीश मिश्र या समितीत अशासकीय सदस्य असतील. या समितीचा कार्यकाळ शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३ वर्षाकरिता किंवा समितीची पुनर्रचना होईपर्यंत असेल.


Tags: Cultural Affairs Departmentgood newsMaharashtramuktpeethSelection Committees reconstitutedचांगली बातमीनिवड समित्या पुनर्गठितमहाराष्ट्रमुक्तपीठसांस्कृतिक कार्य विभाग
Previous Post

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रातील ग्रंथालयात ‘दिवाळी अंकांचं प्रदर्शन

Next Post

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

Next Post
Swachh Vidyalaya Award

महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!