मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मोरबी पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाला मोरबी पूल घटनेशी संबंधित तपास आणि इतर गोष्टींवर वेळोवेळी लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोरबी पूल दुर्घटनेला ‘मोठी शोकांतिका’ म्हटले आहे.
स्वतंत्र सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश!
- गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या घटनेची आधीच स्वत:हून दखल घेतली आहे.
- यावर अनेक आदेश दिले आहेत.
- सध्या मोरबी पुल याचिकेवर सुनावणी होणार नाही.
- सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र सीबीआय चौकशी, पुरेशी नुकसानभरपाई या याचिकांसह उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे.