मुक्तपीठ टीम
भारत सरकार आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात अनेक उत्पादने तयार केली जात आहेत. संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियामुळे आता अनेक संरक्षण उपकरणे भारतात तयार होत आहेत. आता वैद्यकीय क्षेत्रातही भारत स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.
देशात सर्जिकल रोबोट व्यावसायिक तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे सहकार्य घेण्यात येणार असून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमात सर्जिकल रोबोटचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
एसएस इनोव्हेशनची ग्लोबल झळाळी!
- वैद्यकीय क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी एसएस इनोव्हेशन कमी खर्चात आणि दर्जेदार सर्जिकल रोबोट्स बनवत आहे.
- असे करणारी ही दक्षिण आशियातील पहिली कंपनी आहे आणि आता ही कंपनी जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
- एसएस इनोव्हेशनने अमेरिकन कंपनी अवरा मेडिकल रोबोटिक्स या अमेरिकन कंपनीसोबत करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकन कंपनी नॅस्डॅकमध्ये सूचीबद्ध आहे.
- या कंपनीच्या अधिग्रहणामुळे एसएस इनोव्हेशनचा मेक इन इंडिया सर्जिकल रोबोट जागतिक बाजारपेठेत पोहोचला आहे.
जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यावर डॉ. सुधीर श्रीवास्तव यांचे वक्तव्य…
- एसएस इनोव्हेशनचे संस्थापक आणि प्रख्यात रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, या संपादनामुळे जगभरातील वैद्यकीय सेवेत मोठा बदल होईल.
- मेक इन इंडिया उत्पादनाच जागतिक स्तरावर झळकेल.
- रोबोटिक शस्त्रक्रियेतून रुग्णांना बरे होण्यासाठी कमी वेळ लागेल आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्चही कमी होईल.
- यासोबतच दूरवर बसलेल्या लोकांवर शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे.
- आमचा प्रयत्न असा सर्जिकल रोबो बनवण्याचा आहे, ज्याची किंमत कमी असेल आणि तो दर्जेदार असेल, जेणेकरून सर्वसामान्यांना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल.
त्याचवेळी, अवारा मेडिकल रोबोटिक्सचे संस्थापक आणि सीईओ बॅरी एफ कोहेन यांनी सांगितले की, “भारतात येऊन मला नेहमीच आनंद होतो. जागतिक स्तरावरील लोकांना स्वस्त आणि दर्जेदार शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही एसएस इनोव्हेशन्ससोबत भागीदारी केली आहे. या करारामुळे रोबोटिक सर्जरीच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल होणार आहे.”