मुक्तपीठ टीम
अलिकडच्या काळात आधार कार्डची गरज बहुतेक सरकारी कामांसाठी असल्याचे दिसून येते. आधारकार्डकडे सर्वात महत्वाचा दस्ताऐवज म्हणून पाहिले जाते. याला यूनीक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहे, ज्यात युजर्सच्या महत्त्वाच्या माहितीचा तपशील असतो.
यूआयडीएआय आधारसह बर्याच सेवा देखील प्रदान करते. एखाद्याचा आधारकार्ड क्रमांक खरा आहे की खोटा हे ऑनलाइन पोर्टलद्वारे तुम्ही तपासू शकता. ही सेवा बर्याचदा कर्मचार्यांची ओळख पडताळण्यासाठी वापरली जाते.
आधार क्रमांक खरा आहे की नाही कसे ओळखावे
- सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification वर जावे.
- या वेबसाइटवर जाताच आधार व्हेरिफिकेशन पेज तुमच्यासमोर उघडेल. त्यात तुम्हाला टॅक्स बॉक्स दिसेल. येथे आपल्याला आपला आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
- यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक कॅप्चा दिसेल जो आपल्याला एंटर करावा लागेल.
- यानंतर खाली दिलेल्या व्हेरिफेकेशच्या पर्यायाला निवडावे लागेल. जर तुमचा आधार क्रमांक बरोबर असेल तर नवीन पेज उघडेल. आपला आधार नंबर त्यात दिसून येईल. तसेच, सर्व तपशील देखील दिसतील.
- परंतु जर आपला आधार क्रमांक बनावट असेल तर ते पेज उघडणार नाही आणि इनवॅलिड आधार क्रमांक लिहीलेले दिसेल.
- जर आपले आधार कार्ड बनावट ठरले तर आपण त्याबद्दल तक्रार देखील दाखल करू शकता. जर आपल्यास आधारशी संबंधित काही तक्रार असेल तर आपण १९४७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, कोणीही नोंदणीच्या वेळी किंवा आधार कार्डवरील माहिती अपटेड करताना दिलेला ईमेल, पत्ता आणि मोबाइल क्रमांक प्रमाणित करू शकतो. तसेच ऑनलाईन सेवाचे लाभ घेण्यासाठी मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डला जोडणे आवश्यक आहे. जर मोबाइल क्रमांक आधारसह नोंदणीकृत नसेल तर युजर्सना जवळच्या आधार केंद्राला (पीएसी) भेट देऊन नोंदणी करुन घ्यावी लागेल.