मुक्तपीठ टीम
दुसरे महायुद्ध अनुदानधारक माजी सैनिक, विधवा यांनी हयातीचे दाखले आपल्या बँकेद्वारे अथवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत प्रत्यक्ष जमा करावेत, असे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी कळविले आहे.
माजी सैनिक, विधवा यांनी ग्रामसेवक, तलाठी, शासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, बँक मॅनेंजर यांच्याकडून हयातीचे दाखले घेऊन बँक पासबुकच्या पहिल्या व पासबुक प्रिंट केलेल्या शेवटच्या पानाची झेरॉक्स आणि ओळखपत्राची झेरॉक्स जोडून सादर करावेत. काही अपरिहार्य परिस्थितीत लाभार्थीचे नातेवाईकाकडून सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे लाभार्थी हयात असलेली पडताळणी करण्यास सोय करण्यात आली आहे.
हयातीचा दाखला वेळीच सादर न केल्यास डिसेंबर २०२२ पासून अनुदान बंद करण्यात येईल. यासाठी हयातीचे दाखले मुदतीत सादर करावेत असेही, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.