मुक्तपीठ टीम
अलीकडल्या काळात दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दम्याला अस्थमादेखील म्हणतात. दमा हा फुफ्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार आहे. बालदिनानिमित्त अल्केमने आपल्या “हेल्थी लंग” या उपक्रमाद्वारे मुलांमध्ये दम्याबद्दल जागरूकता पसरवण्याचा संकल्प साधला आहे. मुले ही नाजूक असतात. त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळेच हे अभियान राबवण्यात येत आहे.
हेल्दी लंग्ज पोर्टल www.thehealthylungs.com हे एक व्यासपीठ आहे जिथे फुफ्फुसांशी संबंधित आजारांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल. हे पोर्टल रुग्णांना त्यांचे अनुभव शेअर करण्याची सुविधा देखील देते, जेणेकरून रुग्ण दुसऱ्यांपर्यंतही जागृकता पोहोचवू शकतील.
मुलांमध्ये दम्याचे वाढते प्रमाण! हेल्थी लंग्स दाखवणार योग्य मार्ग
- दमा हा एक मोठा गैर-संसर्गजन्य आजार आहे, जो लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही प्रभावित करतो.
- मुलांमध्ये हा सर्वात सामान्य आजार आहे.
- विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दम्याच्या बहुतेक प्रकरणांचे निदान आणि योग्य उपचार केले जात नाहीत.
- या बालदिनी, हेल्थी लंग्सने पालकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून ते आपल्या मुलांबद्दल चांगले निर्णय घेऊ शकतील.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात दम्याचे ३ कोटी ७८ लाख रुग्ण आहेत. जागतिक दम्याच्या मृत्यूंमध्ये भारताचा वाटा ४२ टक्क्यांहून अधिक आहे.
मुलांमध्ये दम्याची कारणे कोणती?
- घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषण आणि धुराच्या संपर्कामुळे नवजात आणि शाळेत न जाणार्या लहान मुलांमध्ये दम्यासारख्या श्वसन आजारांचा धोका वाढतो.
- वाहतुकीशी संबंधित प्रदूषणामुळे मुलांमध्ये दम्याच्या रुग्णांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- जगभरात, ५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांपैकी ११-१४ टक्के मुलांना सध्या दम्याची लक्षणे आहेत.
- त्यापैकी अंदाजे ४४ टक्के पर्यावरणीय संपर्कांशी संबंधित आहेत. . उपचार न केल्यास, दमा गंभीर होऊ शकतो आणि अनेकदा फुफ्फुसाचा झटका येऊ शकतो.
- दमा हा एक फुफ्फुसाचा विकार आहे. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
अल्केम लॅबोरेटरी लिमिटेडचा ‘हेल्थी लंग’ संकल्प… काय आहे अल्केम कंपनी? जाणून घ्या
- अल्केम लॅबोरेटरी लिमिटेड ही एक आघाडीची भारतीय फार्मास्युटिकल कंपनी आहे.
- कंपनी ब्रँडेड जेनेरिक, जेनेरिक औषधे, एपीआयएस आणि न्यूट्रास्युटिकल उत्पादने बनवते, ज्याची ती भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करते.
- भारतातील ८००हून अधिक ब्रँड्सच्या पोर्टफोलिओसह, अल्केम ही देशांतर्गत विक्रीच्या बाबतीत भारतातील पाचवी सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे.
- कंपनीची ४०हून अधिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उपस्थिती आहे, युनायटेड स्टेट्स ही तिची प्रमुख बाजारपेठ आहे.