मुक्तपीठ टीम
जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचे असेल तर ही बातमी उपयोगी आहे. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राप्रमाणे पॅनकार्ड असणेही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर पॅनकार्ड नसेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयकराशी संबंधित कामांव्यतिरिक्त, बँकिंगशी संबंधित कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
पॅन कार्ड काढणे झाले अगदी सोपे…
- पॅन कार्ड काढणे खूपच सोपे झाले आहे.
- घर बसल्याही पॅन कार्ड काढता येते.
- यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- याअंतर्गत तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज सहज करू शकता.
- यासोबतच पॅनकार्डमध्ये काही चूक झाली तरी दुरुस्तही करता येते.
पॅन कार्ड काढण्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- पॅन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
- भारतीय नागरिक असल्यास, PAN Card NSDL(https://tin.tin.nsdl.com/pan/index.html) किंवा UTITSL (https://www.pan.utiitsl.com/PAN/) द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
- यासाठी जीएसटी व्यतिरिक्त ९३ रुपये शुल्क जमा करावे लागतील.
- ऑनलाइन फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे.
- याशिवाय बँकिंग ड्राफ्टद्वारेही पैसे जमा करू शकता. त्यानंतर एक अर्ज भरावा लागेल.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
- फॉर्म भरताना माहिती द्यावी लागेल.
- येथे नाव, पत्ता, वय, फोन नंबर टाकण्यास सांगितले जाईल.
- यानंतर काही कागदपत्रे द्यावी लागतील. जे NSDL/ UTITSL कार्यालयामार्फत कागदपत्रे सबमिट करू शकता.
- कागदपत्राशिवाय पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पुढे जाणार नाही. . कागदपत्रांची फोटो कॉपी पाठवताच, ही प्रक्रिया पुढे जाते.
- यानंतर अंतिम टप्प्यात पोहोचाल, जिथे १० दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
- १० दिवसांच्या आत तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड पोहोचते.