मुक्तपीठ टीम
एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत जामीनावर सुटून आल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढली असा दावा होत असतानाच, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नेमकं तसं का केलं, ते त्यांनीच स्पष्ट शब्दात मांडलं आहे.
किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश!!
- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून खासदार गजानन कीर्तीकर यांची ओळख आहे.
- गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
- अखेर त्यांनी आज माहीम विधानसभा नागरीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला.
- यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.
- गजानन कीर्तीकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत.
- त्यांचं शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाचं वैयक्तिक मोठं नुकसान झालं आहे.
पिता शिंदे गटात, तर सुपुत्र ठाकरेंसोबत राहणार…
- गजानन कीर्तीकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटातील खासदारांची संख्या कमी झालीय.
- गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
- वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तीकर यांनी दिली आहे.
- उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे ठाकरेंच्या विश्वासाला जागत अमोल यांनी वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंना सोडू शकत नाही, ते योग्य नाही, असं अमोल कीर्तीकरांनी आपल्या वडिलांनाही समजवलं होते. पण त्यांनी ऐकलं नाही.