मुक्तपीठ टीम
कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोली यांच्या विधानावरुन सर्वत्र गदारोळ माजला आहे. ६० वर्षीय सतीश जारकीहोळी म्हणाले की, ‘हिंदू शब्दाचा उगम पर्शियन भाषेतून झाला आणि मूळ शब्दाचा अर्थ खूप वाईट आहे. आता देशभरात या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर चौफेर टीका होऊनही, सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ या शब्दाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम राहिले. त्यांचे म्हणणे चुकीचे सिद्ध झाल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ. आता भाजप या मुद्द्यावर थेट राहुल गांधींना प्रश्न विचारत आहेत.
सतीश जारकीहोलींचे वक्तव्य…
- ६ नोव्हेंबरला एका कार्यक्रमात सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ या शब्दाचे पर्शियन वर्णन करताना त्याचा अर्थ समजलात तर तुम्हाला लाज वाटेल, असे सांगितले. कारण, ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ वाईट आहे.
- या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
- मात्र, अनेक पुस्तकांतून जाऊन आपण हे विधान केल्याचे सांगत त्यांनी आपला बचाव केला.
- जे कोणी त्यांच्यावर हिंदुद्रोही अशी टीका करत असतील त्यांनी ते पुस्तक वाचावे. ते या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहेत.
- स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश, डॉ. जी.एस. पाटील यांच्या बसव भारत या पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख आहे.
- ‘हिंदू’ हा शब्द तुमचा कसा आला? WhatsApp, Wikipedia वर तपासा, शब्द तुमचा नाही. हा शब्द इतरांवर का लादायचा. त्याचा अर्थ भयंकर आहे. असे ते म्हणाले.
काँग्रेसचीही सतीश जारकीहोली यांच्यावर नाराजी
- सतीश यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड नाराज आहे.
- जारकीहोली यांनी राज्याचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांना या प्रकरणी फोन करण्यास सांगितले.
- सुरजेवाला यांनी सतीश यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगून ते पक्षाचे मत नसल्याचे म्हटले होते.
सतीश जारकीहोलींच्या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया
- कर्नाटक काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सतीश जारकीहोली अर्ध्या ज्ञानाने विशिष्ट समाजाच्या मतदारांना खूश करण्यासाठी अशी विधाने करतात आणि अल्पसंख्याकांची मते मिळवण्याचे स्वप्न पाहतात.
- हे देशविरोधी असून सर्वांनी त्याचा निषेध केला पाहिजे.
- राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्या मौनाचा अर्थ, ते सतीश यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत का?