Friday, April 24, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा महाराष्ट्राचे सुपुत्र! धनंजय चंद्रचुडांकडे २ वर्षांचा कालावधी!!

November 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
DY Chandrachud to be 50th Chief Justice of India

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू न्यायमूर्ती चंद्रचूड यांना पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती चंद्रचूड हे १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत दोन वर्षांसाठी या पदावर असतील. ते न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील, ज्यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ-

  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • ते २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
  • त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.

ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांचा भाग-

  • ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत.
  • यामध्ये अयोध्या वाद, आयपीएसच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी घोषित करणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदींचा समावेश आहे.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडीलही सरन्यायाधीश होते-

  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला होता.
  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी सुमारे सात वर्षे आणि चार महिने मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील सीजेआयचा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ होता.
  • २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत ते सरन्यायाधीश होते.
  • न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी राष्ट्रीय राजधानीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए ऑनर्स केले आणि दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून एलएलबी केले.
  • त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, यूएसए मधून एलएलएम आणि फॉरेन्सिक सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवली.

Tags: Dhananjaya Y. ChandrachudIndiaSupreme Courtन्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूडभारतसर्वोच्च न्यायालय
Previous Post

भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत आयटी प्रोफेशनल्ससाठी ४१ जागांवर करिअर संधी

Next Post

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुडांनी बजावली ‘या’ महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका…

Next Post
DY Chandrachud

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुडांनी बजावली 'या' महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!