मुक्तपीठ टीम
भारतीय पोस्ट पेमेंट्स बॅंकेत सरकारी नोकरीची संधी आहे. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने आयटी प्रोफेशनल्ससाठी ही भरती जाहिर केली आहे. आयटी विभागात असिस्टेंट मॅनेजर या पदासाठी १८ जागा, मॅनेजर या पदासाठी १३ जागा, सीनियर मॅनेजर या पदासाठी ८ आणि चीफ मॅनेजर या पदासाठी २ जागा अशा एकूण ४१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- असिस्टेंट मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- सीनियर मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ९ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
- चीफ मॅनेजर- १) आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीएससी/ बीई/ बीटेक/ एमएससी/ बीसीए किंवा एमसीए उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) तसेच संबंधित कामाचा किमान ११ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा
असिस्टेंट मॅनेजर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत, मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर पदासाठी ३५ वर्षांपर्यंत तर, चीफ मॅनेजर या पदासाठी ४५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट ippbonline.com वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://ibpsonline.ibps.in/ippbitoct22/
अधिकृत जाहिरात
https://ippbonline.com/documents/31498/132994/1667569796101.11.2022.pdf