मुक्तपीठ टीम
रात्री ट्रेनमध्ये प्रवास करत असताना सहसा झोप येते. झोपेमुळे ज्या स्टेशनवर उतरायचे आहे ते स्टेशन चुकते आणि पुढच्या स्टेशनवर उतरावे लागते. जर आपण भारतीय रेल्वेचा प्रवास करत असाल आणि तेही रात्री, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. आता स्मार्टफोनमध्ये डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म चालू करून अर्लट सेट करु शकतात. रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत प्रवास करणारे प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील. भारतीय रेल्वेच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घेऊया…
IRCTC चा डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म कसा अॅक्टिव्ह करायचा…
- भारतीय रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांक १३९ वर कॉल करा.
- त्यानंतर भाषा निवडावी लागेल.
- ज्या ठिकाणी जायचे आहे ते स्थान निवडा.
- यासाठी प्रथम ७ आणि नंतर २ दाबावे लागेल.
- यानंतर ट्रेनचा पीएनआर क्रमांक समाविष्ट करा.
- पीएनआर क्रमांक एंटर केल्यावर १ दाबा.
- एकदा पुष्टी झाल्यावर, स्मार्टफोनवर एक वेकअप अलार्म सेट होतो.
IRCTC चा डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म आहे तरी काय ?
- आयआरसीटीसीच्या डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्मच्या मदतीने रात्री प्रवास करताना प्रवाशांचे स्टेशन चुकण्याचा धोका कमी होईल.
- प्रवास करताना स्मार्टफोनवर ही सेवा सक्रिय करा.
- ही सेवा सक्रिय केल्यानंतर, स्टेशनवर पोहोचण्याच्या २० मिनिटे आधी स्मार्टफोनवर एक मेसेज येईल.
- ही सूचना अलार्मसारखी असेल.
- IRCTCची ही सेवा मोफत नाही, परंतु यासाठी प्रत्येक वेळी ३ रुपये मोजावे लागतील.