मुक्तपीठ टीम
ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, एमटीएस, तंत्रज्ञ आणि अशा इतर पदांसाठी एकूण २८० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण ठाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, डीएम/ एमडी/ बीडीएस/ एमबीबीएस/ बीएएमएस/ बीयूएमएस/ बीएचएमएस/ एमसीए/ एमए/ बीसीए/ एमएसडब्ल्यू/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग/ पदवीधर/ १०/ आयटीआय/ १२वी/ डीएमएलटी केलेलं असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक आणि परिचारिका या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत, सुपर स्पेशालिस्ट पदासाठी ७० वर्षांपर्यंत आणि उर्वरित इतर पदांसाठी १८ ते ३८ वर्षांपर्यंत उमेदवारांचे वय असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल वर्गातील उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, मागासवर्गीय उमेदवारांकडून २०० रूपये शुल्क आकारले जाणार आहेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट https://nhm.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1F8CHXOO6G5Qc2SJ4HFRBYEYntI2MH0x_/view