मुक्तपीठ टीम
पंजाबमधील अमृतसरमध्ये मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसलेले शिवसेना नेते सुधीर सूरी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर सूरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोळीबारानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करून मारेकऱ्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
सूरी यांचा मारेकरी गजाआड!!
- अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सूरी यांची हत्या करणारा आरोपी पोलिसांनी पकडला आहे.
- हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.
- या हत्येबाबत पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, आरोपी संदीप सिंहविरुद्ध कलम ३०२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
- त्याची चौकशी सुरू आहे.
- मारेकरी संदीप सिंह हा अमृतसरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
सुधीर सूरी मंदिराबाहेर धरणे आंदोलनाला बसले होते-
- पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की, सुधीर सूरी गोपाल मंदिर व्यवस्थापनावरील वादावरून धरणे आंदोलनाला बसले होते.
- तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला.
- मारेकऱ्याचे तेथे कपड्यांचे दुकान आहे. त्याने आपल्या परवाना असलेल्या ३२ बोअरच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केला.
- घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं होतं.
- मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अनेक दिवसांपासून रचला जात होता हत्येचा कट:
- विशेष म्हणजे शिवसेना नेत्याच्या हत्येचा कट अनेक दिवसांपासून सुरू होता.
- गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती.
- चौकशीदरम्यान आरोपींनी हा गौप्यस्फोट केला होता.
- सुधीर सूरी यांना पोलिसांनी सुरक्षा दिली असली तरी त्यानंतरही त्यांची हत्या झाली.