मुक्तपीठ टीम
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये ‘मटेरियल असिस्टंट’ या पदावर एकूण ४१९ जागांसाठी नोकरीची संधी आहे. यूआर वर्गातील उमेदवारांसाठी १७१ रिक्त जागा, ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ४२ रिक्त जागा, ओबीसी उमेदवारांसाठी ११३ रिक्त जागा, एससी उमेदवारांसाठी ६२ रिक्त जागा आणि एसटी उमेदवारांसाठी ३१ रिक्त जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतील पदवी/ मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://indianarmy.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1rN1cxUhJr2ify60HxBgPNQAKq8pW2Da7/view