Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंडो-इटालीयन औद्योगिक संबधांची पाच दशके…

November 3, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Celebration of Five Decades of Indo-Italian Business Relationships 1

मुक्तपीठ टीम

इटली आणि भारताचे संबंध हे नेहमीच सौह्रार्दपुर्ण राहीले आहेत. गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर केल्या जातील. यासाठी राज्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका, इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमित रॉय, आजीवन सदस्य एन के नायर व इतर मान्यवर उपस्थित होते.

इंडो- इटालीयन औद्योगिक संबंधांची पाच दशके साजरे करण्यासाठी मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. इटालीयन दुतावास आणि इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेली पंच्चावन वर्षे भारत आणि इटली देशात औद्योगिक देवाण- घेवाण होत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग, ॲक्सेस कंट्रोल हायवे, जे एन पी ए बंदराचा विकास, लॉजिस्टिक सहकार्यासाठी  फ्रेट रेल्वे यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. इटालीयन उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.

इंडो -इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सुमारे सहाशे उद्योजक आहेत यापैकी तिनशे उद्योग हे महाराष्ट्रात असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. भारतात सुरू झालेल्या ८० हजार स्टार्ट अपपैकी ५० हजार स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत तर शंभर युनिकॉर्न कंपन्यांपैकी २५ कंपन्या महाराष्ट्रातून कार्यरत असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

उत्पादन, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी उत्पादन या सारख्या अनेक क्षेत्रात इटालीयन उद्योजक आपला व्यवसाय करत असल्याचे इंडो – इटालीयन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष अमीत रॉय यांनी सांगितले. आज सुमारे सहाशे उद्योगातून ५० हजाराहून अधिक रोजगार निर्मिती या माध्यमातून झालेली आहे.

इटलीचे भारतातील राजदूत विंचेझो दे लुका यांनी भारतातील आपला अनुभव समृद्ध करणारा असल्याचे सांगितले. गेल्या पाच दशकात केवळ औद्योगिकच नव्हे तर सांस्कृतिक देवाण – घेवाण वाढली असल्याचे ते म्हणाले. जागतिक स्तरावर उत्पादन क्षेत्रात भारतास उत्तम भविष्य आहे. तंत्रज्ञान, नाविन्यता, कल्पकता या सर्वस्तरावर सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मुंबई आणि इटलीतील मिलान या शहरांदरम्यान सिटी टू सिटी रिलेशनशिप उपक्रम राबविण्यात यावा अशी कल्पना त्यांनी मांडली.

गेली कित्येक वर्ष इंडो – इटालीयन चेंबर सोबत जोडले गेलेले आजीवन सदस्य एन के नायर यांनी भारतातील इटालीयन उद्योगांच्या झालेल्या स्थित्यंतराचा आढावा घेतला. सुरूवातीला केवळ दहा सदस्य असलेली ही संस्था आज सहाशे सदस्य असलेली मोठी संस्था आहे. पूर्वी आयात परवाना मिळविण्यात प्रचंड अडचणी येत असत. खुल्या अर्थव्यस्थेनंतर समस्या कमी होत गेल्या. इटलीत “नमस्ते इंडीया” हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती आजीवन सदस्य एन के नायर यांनी दिली.


Tags: India ItalianIndo-Italian Industrial Relationsइंडो-इटालीयनइंडो-इटालीयन औद्योगिक संबध
Previous Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर

Next Post

मुंबई उच्च न्यायालयाचं नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची याचिका फेटाळली, सरकारनं ठरवावं!

Next Post
mumbai high court

मुंबई उच्च न्यायालयाचं नाव महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची याचिका फेटाळली, सरकारनं ठरवावं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!