मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याचे माजी न्यायमूर्तीं व्ही.पी.पाटील यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालय म्हणाले, हा मुद्दा कायदा बनवण्याचे अधिकार असणाऱ्या यंत्रणेने ठरवायचा आहे. न्यायालयाचा इशारा सरकारकडे आहे.
कोण आहेत न्यायमूर्तीं व्ही.पी.पाटील?
- ठाणे येथील व्ही.पी.पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
- त्यांनी २६ वर्षे न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे.
- इतर राज्यांतील संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांच्या उच्च न्यायालयांची नावे ज्या राज्यांत आहेत त्या राज्यांच्या नावानुसार बदलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.
- त्यांनी महाराष्ट्रातील लोकांची विशिष्ट संस्कृती, वारसा आणि परंपरा यांच्या रक्षणासाठी ‘महाराष्ट्र अनुकूलन कायदा आदेश, १९६०’ च्या कलमाच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना मागितले होते.
- ते म्हणाले महाराष्ट्र या शब्दाच्या उच्चाराचे महाराष्ट्रीयन जीवनात विशेष महत्त्व असून, उच्च न्यायालयाच्या नावातही त्याचा वापर व्हायला हवा.