मुक्तपीठ टीम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर रोजी भारतातील पहिला डिजिटल रुपया लाँच केला. प्रायोगिक प्रकल्पाद्वारे विशिष्ट वापरासाठी डिजिटल रुपया लाँच करण्यात आला आहे. डिजिटल रुपया सध्या फक्त मोठ्या रकमांच्या व्यवहारांसाठी व सरकारी रोख्यांमधील व्यवहारांच्या सेटलमेंटसाठी वापरला जाईल.
कोणत्या नऊ बँकांना डिजिटल रूपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी…
- सुरवातीला नऊ बँकांना डिजिटल रूपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.
- आरबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारला डिजिटल चलनाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला होता.
पहिल्या दिवशी किती झाला व्यवहार?
- पहिल्या दिवशी ई-रुपया वापरून २.७५ अब्ज रुपयांची खरेदी-विक्री झाली.
- पहिल्या दिवशी ५ वर्षे आणि १० वर्षांच्या रोख्यांची खरेदी-विक्री झाली.
- मध्यवर्ती बँकेने मंगळवारी आपल्या डिजिटल चलनाचा प्रायोगिक वापर सुरू केला.
- निवडक बँकांना सरकारी सिक्युरिटीजमधील दुय्यम-बाजार व्यवहारांचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर करण्याची परवानगी दिली.
- क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या डेटावरून भारतीय डिजिटल चलनाद्वारे बँकांनी पहिल्या दिवशी रोख्यांमध्ये २.७५ अब्ज व्यवहार केले.
- डिजिटल चलनात सहभागी झालेल्या बँकांनी २०२७ च्या रोख्यांमध्ये १.४ अब्ज रुपयांचे २४ व्यवहार केले.
- २०३२ च्या बाँड्समध्ये एकूण १.३ अब्ज रुपयांचे व्यवहार २३ व्यवहारांद्वारे झाले.
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, RBI २०२२-२३ मध्ये CBDC लाँच करेल.
- डिजिटल चलन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडून हे पहिले अधिकृत विधान होते.
- CBDC आणल्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ती ब्लॉकचेनवर आधारित असेल.