मुक्तपीठ टीम
अॅपल कंपनीचा आयफोन हा ब्रॅंड नेहमीच चर्चेत असतो. हा ब्रॅंड एकामागोमाग एक लेटेस्ट सिरीज आणि आकर्षक फिचरसह आयफोन लॉंच करतो. आता iPhone नवीन मॉडेल बाजारात आणत आहे. अलीकडेच, कंपनीने आपली नवीनतम iPhone 14 सिरीज जगासमोर सादर केली आहे. या स्मार्टफोनमध्ये असे अनेक फिचर्स आहेत ज्यामुळे यूजर्स आनंदी झाले. आता आयफोन १४ नंतर, आयफोन १५ सीरीजशी संबंधित काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, असे म्हटले जात आहे की, आता iPhone 15 Proसारख्या स्मार्टफोन्समध्ये असे काही फिचर्स देणार आहे, जे याआधी कोणत्याही iPhone सिरीजमध्ये दिले गेले नाहीत.
iPhone 15 Pro मध्ये पूर्वीपेक्षा कोणते आकर्षक फिचर्स मिळणार?
- आता कंपनी iPhone 15 Pro मध्ये पूर्वीपेक्षा जास्त रॅम देऊ शकते.
- या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ८ जीबीपर्यंत रॅम सपोर्ट मिळेल.
- iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये ६ जीबीपर्यंत रॅम सपोर्ट मिळते.
आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये कंपनीने स्वतःचा बायोनिक ए१६ चिपसेट वापरला आहे, पण जर आयफोन १५ प्रो मॅक्स बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी त्यात बायोनिक ए१७ चिपसेट वापरू शकते. हा चिपसेट अधिक कार्यक्षम असेल.
iPhone 15 मध्ये फिजिकल बटन्स काढून टाकण्याची शक्यता!
- कंपनी आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्समधून फिजिकल पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे काढून टाकू शकते.
- या बटनांऐवजी आता कंपनी सेन्सर वापरू शकते. हे सेन्सर, स्पर्श केल्यावर, यूजर्सना क्लिक करण्यायोग्य अनुभव देईल.