मुक्तपीठ टीम
हिमालयातील अतिउंचावरील रस्ते हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे बंद होतात. तेथे साचलेले बर्फ काढून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओ ते पुन्हा खुले करते. दरवर्षी जोजिला मार्ग हा लडाखला उर्वरिक देशाशी जोडणारा रस्ता उघडण्यासाठी किमान तीन ते पाच महिने लागतात. पण यावेळी चीनचे संकट सीमेवर असल्यामुळे बीआरओच्या जवानांनी आव्हान समजून फक्त दोन महिन्यात तो रस्ता खुला केला आहे.
जोजिला मार्ग प्रथमच फक्त ५९ दिवसात वाहतुकीसाठी हा खुला करण्यात आला आणि एक विक्रम झाला आहे.
अतिउंचावर अतिअवघड रस्ता!
- मार्ग हा ११,६५० फूट उंचीवर आहे.
- जोजिला हा एक रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचा मार्ग आहे.
- तो लडाखला उर्वरित देशाशी जोडतो.
- हिमवर्षावानंतर तो रस्ता दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्यात बंद होतो.
- त्यानंतर तो मार्चच्या दुसर्या आठवड्यापासून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उघडला जाऊ शकतो.
यावर्षी बीआरओने (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ५९ दिवसात हा मार्ग उघडून विक्रम केला आहे. जोजिला मार्ग सरासरी ९० ते १५० दिवस बंद असतो. चीनच्या कुरापतखोरीमुळे सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांमध्ये वाढ केली आहे. सैनिकांना लॉजिस्टिक सपोर्ट लवकर आणि चांगला मिळण्यासाठी जोजिला खिंड वेळेच्या अगोदर उघडली गेली आहे.
बर्फवृष्टीच्या वेळी लडाख-श्रीनगर महामार्ग ३० ते ४० फूट बर्फाने व्यापलेला असतो. तापमान उणे ३० अंशांपर्यंत पोहोचते. यामुळे लडाखचा देशाच्या इतर भागाशी असलेला संपर्क तुटतो. पण यावेळी सोनमर्ग ते गुमरी या २६ किमी लांबीच्या रस्त्यावरून अवघ्या १४ दिवसात बर्फ काढून बीआरओने एक वेगळा विक्रम नोंदविला आहे.
पाहा व्हिडीओ: