मुक्तपीठ टीम
अमरावती जिल्ह्यातील भाजपा समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे नेते, अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राणा यांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यावर बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला होता. यानंतर हा वाद शिगेला पोहोचला. बच्चू कडूंच्या राजकीय भूकंपाच्या धमकीनंतर रविवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीनंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबाबत केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. बच्चू कडू यांनीदेखील आक्षेपार्ह वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. बच्चू कडू आज कार्यकर्त्यांशी बोलून मंगळवारी मेळाव्यात भूमिका जाहीर करणार आहेत.
रवी राणी-बच्चू कडू यांच्यात झालेले आरोप-प्रत्यारोप!
- रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता.
- रवी राणा यांच्या आरोपांनंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी वेळ पडल्यास शिंदे-फडणवीस सरकारची साथ सोडण्याचे संकेत दिले होते.
- त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या मनधरणीसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांना मुंबईला बोलावण्यात आले होते.
- मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यामुळे मुंबईला जावे लागत आहे, मला राणांसोबत बसण्याची इच्छा नाही असे बच्चू कडू म्हणाले.
- वर्षा बंगल्यावर अडीच तास मिटिंग झाली. आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते, ते मिटले.
- यावेळी रवी राणांनी बच्चू कडूंची माफी मागितली.
आमदार रवी राणांनी आरोप मागे घेतले!
- आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भूमिका मांडली.
- आमदार बच्चू कडू यांच्या बरोबर वाद होते ते मिटले.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या ५० आमदारांमध्ये त्या वक्तव्याने गैरसमज पसरले असतील अथवा आमदार दुखावले
- असतील तर माफी मागतो असे राणांनी म्हटले.
- बच्चू कडूंनीदेखील काही अपशब्द वापरले आहेत. हे शब्द ते देखील मागे घेतील.
- आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत.
राणांच्या माघारीनंतर बच्चू कडू माघार घेणार का?
- राणांच्या नमत्यापणावर बच्चू कडू म्हणतात की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे त्यांचे आभार मानतो.
- अमरावतील मंगळवारी मी भूमिका जाहीर करणार आहे.
- मी काही अयोग्य केले असे मला वाटत नाही.
- माझ्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न या आरोपांमुळे निर्माण झाला होता. त्यामुळे भूमिका घेणे महत्त्वाचे होते.
- उद्या बैठकीत कार्यकर्ते काय भूमिका घेतील यावर माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.” असे त्यांनी सांगितले.
- त्यांनी आमच्या वादामुळे महाराष्ट्रात अडचण नको, असे म्हटल्याने तेही समेटाच्याबाजूनेच असतील, असं मानलं जातं.