संरक्षण संशोधन व विकास संस्थेने म्हणजेच डीआरडीओनं सबमशीनगनचं डिझाइन केलंय. या सब-मशीन गनची चाचणी संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलीय. त्यामुळे सैन्य, पोलीस आणि सशस्त्र दलांकडून ही मेड इन इंडिया गन वापरण्याचा मार्ग मोकळा झालाय.. ही गन ऑटोमॅटिक आहे. ती गॅसवर चालेल. एका मिनिटात ७०० राउंड झाडण्याती क्षमताय. सब-मशीन गनकडून १०० मीटरपेक्षा जास्त लक्ष्य साधता येईल. गनचे वजन ३ किलो आहे. लो बॅक धक्का, अॅडजेस्टेबल बट ही त्याची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. एका हातानेदेखील ही गन चालविली जाऊ शकते.
संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यूजर ट्रायलचा शेवटचा टप्पा सोमवारी संपला होता. चाचणीसाठी सैन्याने जनरल स्टाफ क्वॉलिटेटीव्ह रिक्वायरमेंट तयार केले होते. गरम आणि थंड जागेच्या ठिकाणी गनची चाचणी घेण्यात आली. गृहमंत्रालयाने आधीच गनला मंजूरी दिली आहे. आता ही गन केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि इतर पोलिस संघटनांना देण्यात येईल.