मुक्तपीठ टीम
स्टाफ सिलेक्शन कमिशनने सीमा सुरक्षा दल आणि आसाम रायफल्स यासह अनेक दलांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. कॉन्स्टेबलच्या एकूण २४,३६९ पदांसाठी ही मेगाभरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी परीक्षा उत्तीर्ण केली असावी.
वयोमर्यादा
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून १०० रूपये ऑनलाइन पद्धतीने आकारले जाईल.
अधिक माहितीसाठी CRPFच्या अधिकृत वेबसाइट http://www.crpf.gov.in. वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
अधिकृत जाहिरात
https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_ctgd_27102022.pdf








Subscribe